Price: ₹170.00
(as of Mar 04,2023 11:48:07 UTC – Details)
‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’ हे डेल कार्नेगी यांचं सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तक आहे. कार्नेगी हे जगभरातील विख्यात सेल्फ हेल्प तज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
वाचकांना अधिक आनंददायी आणि समाधानकारक जीवनशैली जगण्यास प्रवृत्त करणं आणि त्यांना केवळ स्वत:बद्दलच नव्हे तर इतरांबद्दलदेखील अधिक जागरूकतेनं विचार करायला लावणं हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. वाचकांना आयुष्यातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी कार्नेगी दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घडामोडींचा वेध घेतात. या पुस्तकात वाचकांसाठी आहेत मन:शांती आणि आनंदाच्या मार्गावर नेणारा दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठीचे सात मार्ग –
तुमचं आयुष्य बदलून टाकणारे आठ शब्द जाणून घ्या.
बदला घेताना चुकवावी लागणारी मोठी किंमत टाळा.
कृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता, केवळ दातृत्वाच्या आनंदासाठी देत रहा.
जे मिळालंय ते मोजा, अडचणी मोजू नका.
स्वत:ला ओळखा… पृथ्वीवर तुमच्यासारखं इतर कोणीही नाही हे कायम लक्षात असू द्या.
लोकांनी दगड फेकून मारलेत ? तेच घेऊन महाल उभा करा!
इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल असं एक तरी सत्कर्म रोज करा.
From the Publisher
How to Stop Worrying and Start Living Book in Marathi
‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’ हे डेल कार्नेगी यांचं सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तक आहे. कार्नेगी हे जगभरातील विख्यात सेल्फ हेल्प तज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात. वाचकांना अधिक आनंददायी आणि समाधानकारक जीवनशैली जगण्यास प्रवृत्त करणं आणि त्यांना केवळ स्वत:बद्दलच नव्हे तर इतरांबद्दलदेखील अधिक जागरूकतेनं विचार करायला लावणं हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. वाचकांना आयुष्यातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी कार्नेगी दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घडामोडींचा वेध घेतात. या पुस्तकात वाचकांसाठी आहेत मन:शांती आणि आनंदाच्या मार्गावर नेणारा दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठीचे सात मार्ग –
तुमचं आयुष्य बदलून टाकणारे आठ शब्द जाणून घ्या.बदला घेताना चुकवावी लागणारी मोठी किंमत टाळा.कृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता, केवळ दातृत्वाच्या आनंदासाठी देत रहा.जे मिळालंय ते मोजा, अडचणी मोजू नका.स्वत:ला ओळखा… पृथ्वीवर तुमच्यासारखं इतर कोणीही नाही हे कायम लक्षात असू द्या.लोकांनी दगड फेकून मारलेत ? तेच घेऊन महाल उभा करा!इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल असं एक तरी सत्कर्म रोज करा.
चिंतेवर मात करण्यासाठी मी एका प्रयोगशाळेत सलग पाच वर्षे काम केले – ही प्रयोगशाळा मी माझ्या स्वत:च्या प्रौढवर्गात चालवली.
माझ्या माहितीनुसार अशा प्रकारची ही प्रयोगशाळा जगातील पहिली आणि एकमेव अशी आहे. आम्ही जे केले ते असे! चिंता करण्याचे थांबवण्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नियमांचा एक संच दिला आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात त्या नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आणि त्यांना जे परिणाम दिसून आले त्याबद्दल त्यांना वर्गात सांगण्यास उद्युक्त केले. इतरांनी यापूर्वी त्यांनी वापरलेल्या तंत्रांबद्दल माहिती दिली.
या अनुभवाचा परिणाम म्हणजे, इतर ‘चिंतेवर मात कशी करावी?’ या विषयावर या जगात कोणत्याही व्यक्तीपेक्षा मी अधिक व्याख्याने ऐकली असावीत असा माझा कयास आहे. या व्यतिरिक्त‘मी चिंतेवर कशी मात केली?’ या विषयावरील शेकडो व्याख्याने मी माझ्या वर्गात वाचून दाखवली. अनेक पुरस्कार कमावलेली ही व्याख्याने मला पोस्टाने पाठवण्यात आली होती आणि अमेरिका व कॅनडामधील एकशे सत्तरपेक्षा अधिक शहरात ती प्रसारित झाली होती. थोडक्यात सांगायचे झाले तर हे पुस्तक एका कपोलकल्पित मनोहर सिद्धान्तातून अथवा हवेतील मनोर्यातून पैदा झालेली निर्मिती नव्हती, किंवा चिंतेवर कशाप्रकारे मात करता येईल यावरील हे पुस्तकी प्रवचन नव्हते. याऐवजी मी हजारो व्यक्तींनी चिंतेवर कशा प्रकारे मात केली याविषयी एक अति वेगवान, अचूक अन् समर्पक तथ्यांवर आधारित अहवाल तयार केला आहे. एक गोष्ट मात्र खरी : हे पुस्तक कृतिक्षम म्हणजेच
प्रॅक्टिकल आहे. तुम्ही ते आचरणात आणू शकता, अंगीकारू शकता.
फे्ंरच तत्त्ववेत्ते व्हॅलेरी म्हणत, ‘‘विज्ञान म्हणजे यशस्वी कार्यपद्धतींचा एक संग्रह आहे. हे पुस्तकसुद्धा तसेच आहे. आपल्या आयुष्यातील चिंता पळवून लावण्यासाठी उपयुक्त अन् काळाच्या निकषावर सिद्ध झालेल्या अशा यशस्वी कार्यपद्धतींचा हा संग्रह आहे. मी तुम्हाला सूचित करतो की, यात तुम्हाला नवीन असे काहीही आढळणार नाही; परंतु यातील बहुतेक उपाय सर्वसामान्यत: लागू केले जात नाहीत असे तुम्हाला दिसून येईल. असे असताना तुम्हाला अन् मला नवीन असे काही सांगण्याची गरज नाही. आपले आयुष्य आदर्शपणे जगण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल आपल्याला आधीच बर्याच गोष्टी माहीत आहेत. आपण सर्वांना अनेक आदर्श नियम अन् सुखी संसाराची गुरुकिल्ली इत्यादी बरीच माहिती आहे. अज्ञान ही आपली समस्या नाही; पण कृतिहीनता हा मोठा अडथळा आहे. भूतकाळातील अनेक मूलभूत तत्त्वांचे उदात्तीकरण, त्यांचे पुन:प्रतिपादन, सरलीकरण आणि प्रस्तुतीकरण करून तुम्हाला खडबडून जागे करणे आणि त्यांचा आपल्या आयुष्यात अंगीकार करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
– डेल कार्नेगी
तुम्हाला चिंताजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलद आणि हमखास उपाय हवा आहे का? असा एखादा उपाय की जो हे पुस्तक आणखी पुढे वाचण्यास सुरू करण्याआधी तुम्ही लगेच वापरू शकता?
मग मला तुम्हास वातानुकूलन व्यवसायाची सुरुवात करणार्या विलिस एच. कॅरियर या अतिप्रगल्भ इंजिनिअरने शोधून काढलेल्या पद्धतीबद्दल सांगू द्या. आज ते सिरॅक्युज, न्यूयॉर्कमधील कॅरिअर कॉर्पोरेशन या जगविख्यात कंपनीचे प्रमुख आहेत. चिंतेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी वापरण्यात येणार्या सर्वोत्तम उपायांपैकी ती एक आहे आणि न्यूयॉर्कमधील इंजिनिअर्स क्लबमध्ये मी कॅरियर यांच्या बरोबर जेवत असताना प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ती मला मिळाली.
मि.कॅरियर म्हणाले, ‘‘मी तरुण असताना न्यूयॉर्कमधील बफेलो फोर्ज कंपनीत कामाला होतो. मला क्रिस्टल सिटी-मिसरीमधील कोट्यवधी डॉलर्स किमतीच्या पिट्सबर्ग ग्लास कंपनीच्या कारखान्यात गॅस स्वच्छ करण्याचे यंत्र बसवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या यंत्राचे काम गॅसमधील अशुद्ध घटक दूर करण्याचे होते, ज्यामुळे तो जळताना इंजिन्सना नुकसान होण्याचे टाळता येत असे. गॅस स्वच्छ करण्याची ही पद्धत नवी होती. ती अगदी वेगळ्या परिस्थितींमध्ये एकदाच वापरण्यात आली होती. क्रिस्टल सिटी-मिसुरीमधील माझ्या कामात काही अनपेक्षित अडचणी उद्भवल्या. काही प्रयोगानंतर ती काम करू लागली; परंतु आम्ही जी हमी दिली होती ती मात्र पूर्ण करण्याइतपत नाही.
माझे अपयश पाहून मी हादरून गेलो. जणू काही माझ्या डोक्यावर कोणीतरी वार केला होता. माझ्या पोटात ढवळू लागले. काही काळ त्या चिंतेमुळे मी झोपूसुद्धा शकलो नाही.
शेवटी माझ्या सुज्ञपणामुळे मला लक्षात आले की, चिंता केल्याने काहीच होणार नाही आणि मग चिंतेत बुडून न जाता माझ्या समस्येचा सामना करण्याचे मी ठरवले. ही पद्धत खूप प्रभावीपणे काम करू लागली. हा चिंताविरोधी उपाय मी आता गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळ वापरत आहे. तो अगदी साधा आहे. तो कुणासही वापरता येतो. यात तीन पर्याय आहेत.
पायरी1 : मी परिस्थितीचे निर्भीड आणि प्रामाणिकपणे विश्लेषण केले आणि या अपयशाचा वाइटात वाईट परिणाम काय होईल याचा अंदाज बांधला. मला कोणी तुरुंगात टाकणार नव्हते किंवा मारणार नव्हते हे मात्र अगदी नक्की! मी माझा हुद्दा गमावू शकण्याची शक्यता होती हे खरे होते आणि माझ्या मालकांना ते मशीन बाहेर काढावे लागले असते ही शक्यता देखील होती, ज्यामुळे आम्ही गुंतवलेल्या वीस हजार डॉलर्सना मुकावे लागले असते.
पायरी2 : वाइटात वाईट काय होऊ शकते या शक्यतेचा अंदाज घेतल्यानंतर, गरज पडल्यास मी ते स्वीकारण्यासाठी माझ्या मनाची तयारी केली. मी मनाशी म्हणालो, ‘हे अपयश माझ्या कारकिर्दीवर कलंक बनेल आणि कदाचित मला नोकरीस मुकावे लागेल; पण तसे झाले तर मला दुसरी नोकरी नक्कीच मिळेल.’ परिस्थिती याहून वाईट असू शकेल आणि माझ्या मालकांबद्दल विचार करायचा झाला तर त्यांना ठाऊक आहे की, आपण गॅस स्वच्छ करण्याच्या नव्या पद्धतीचा प्रयोग करत आहोत. जर या प्रयोगाचा भुर्दंड वीस हजार डॉलर्स असेल तर ते तो सहन करू शकतात, ते हा खर्च संशोधन या नावाखाली दाखवू शकतात, कारण हा एक प्रयोग आहे.
वाइटात वाईट काय घडू शकते याचा अंदाज घेतल्यानंतर आणि त्याचा स्वीकार करण्याची मनाची तयारी केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट घडली. मी लगेच तणावमुक्त झालो आणि मला अनेक दिवसांपासून सतावत असलेल्या अशांतीच्या भावनेपासून माझी सुटका झाली.
पायरी3: त्या वेळेपासून मी मनात स्वीकारलेल्या वाइटात वाईट घटनेत सुधारणा कशी करता येईल यावर माझा वेळ आणि ऊर्जा शांत चित्ताने खर्च केले.
आता आम्हाला होऊ शकणार्या वीस हजार डॉलर्सच्या नुकसानाच्या रकमेत कशा प्रकारे घट करता येईल यावर मार्ग आणि उपाय शोधण्याचा मी प्रयत्न करू लागलो. त्यासाठी अनेक प्रयोग केले आणि मग शेवटी असा निष्कर्ष काढला की, आपण अतिरिक्त उपकरणांवर आणखी पाच हजार डॉलर्स खर्च केले तर ती समस्या सोडवता येईल. आम्ही तसे केले आणि आमच्या कंपनीचा वीस हजार डॉलर्सचा तोटा होण्याऐवजी आम्ही पंधरा हजार डॉलर्स कमावले.
मी नुसतीच काळजी करत बसलो असतो तर कदाचित मी ही समस्या कधीच सोडवू शकलो नसतो; कारण चिंता आपली एकाग्रतेची शक्ती भंग करते. हा तिचा सर्वांत वाईट परिणाम आहे. आपण चिंता करतो तेव्हा आपले मन इतस्तत: भटकू लागते आणि आपण आपली निर्णयक्षमता गमावून बसतो; परंतु आपण वाइटात वाईट परिस्थितीस तोंड देण्याचा आणि ती स्वीकारण्याचा विडा उचलला तर आपण त्या सर्व काल्पनिक अंधूक विचारांना मूठमाती देतो आणि आपण अशी स्थिती निर्माण करतो की, जेथून आपल्या समस्येवर ध्यान केंद्रित करू शकतो.
मी वर विवरण केलेली घटना अनेक वर्षांपूर्वी घडली. या उपायाने इतक्या उत्तम प्रकारे काम केले की मी तेव्हापासून गेली अनेक वर्षे, आजतागायत हा उपाय वापरत आहे आणि परिणामस्वरूप, माझे संपूर्ण आयुष्य जवळ जवळ चिंतामुक्त झाले आहे.’’
डेल हर्बिसन कार्नेगी
(24 नोव्हेंबर 1888 ते 1 नोव्हेंबर 1955)
सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि वक्ते. स्वयंविकास, विक्रीकला, सहकारी आणि व्यावसायिक क्षेत्राविषयीचे शिक्षण, वत्तृत्वकला, व्यक्ती-व्यक्तीअंतर्गत असणार्या संबंधातले कौशल्य, भाषण कौशल्य असे अनेक लोकप्रिय अभ्यासवर्ग चालवणारे ते प्रशिक्षक होते. त्यांचा जन्म मिसोरीच्या एका मळ्यामध्ये गरीब कुटुंबात झाला. ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुएन्स पीपल’ (1936) आणि ‘हाऊ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’ (1948) अशा अनेक व्यक्तिमत्त्व विकासविषयक लोकप्रिय पुस्तकांचे ते लेखक आहेत.
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd (1 January 2022)
Language : Marathi
Paperback : 288 pages
ISBN-10 : 9352203550
ISBN-13 : 978-9352203550
Reading age : 15 years and up
Item Weight : 220 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India